मी राहुल हरिभाऊ जगदाळे(राव्हल्या) मलवडी गावात एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेलो एक साधा मुलगा. वडील हरिभाऊ(बुवा) आई रुक्मिणी. मोठी बहीण कल्पना आमचे घरगुती जिवन तसे खुपच साधे व हालाकीचे होते. वडील मुंबईला ट्रक ड्रायव्हर अअसल्यामुळे केव्हातरीच गावी यायचे त्यामुळे घरच व रानातल सर्वकाही आई व मोठी बहीण पहायची जस-जसा मी मोठा होऊ लागलो तसा शाळा पाहत आईला कामात मदत करु लागलो. वडील (आण्णा) कधीतरी गावी ट्रक घेऊन यायचे तेव्हा खुप मस्त वाटायचे. लहानपणीचे आयुष्यच वेगळे, आमच्या रानात मोठी आंब्याची झाडे होती शेंदर्या, रोपड्या, नारळी(आता नाहीत) त्याच्यावर सुर पारंब्या खेळायचा वेगळाच आनंद असायचा.दाद्या, बंड्या, आतल्या, आमल्या, मह्या, आब्या, सच्या, सुन्या, ईन्या, पिन्या ही आमची भाव भावांची गॅन्ग आसायची. आमच्यात भांडण पण लय हुयाची त्यात मार खायला मीच असायचु. मंग ईटी-दांडु, गोट्या, सुरफाट्या असले खेळ खेळायचो करड दर्यात शर्ड घिऊन चारायला जायाचु. शाळेत जाताना एकत्र खुप मज्जा यायची हळुहळु आम्ही मोठे होऊ लागलो घरच्या परिस्थिती बद्धल जाणीव होऊ लागली आम्हा सर्वांच्याच घरची परिस्थिती नाजुक होती शेती होती पण पाणी म्हणावे आस नसायचं त्यामुळे शितीत काय जास्त पिकायच नाय.आम्हाला नव ड्रेस यायच म्हणल्यावर कांद वावरातन निगुन लोणंद नायतर कोल्हापुरला जाऊन ईकेपर्यंत वाट बगावी लागायची कदी कदी जुन्यावरच दिवाळी-यात्रा हुयाची. 10 वीत गेल्यावर बिल्डींग तालींच्या कामावर आई बरोबर जाऊ लागलो. आईला काम करताना पाहुन खुप वाईट वाटायचे पण तेव्हा काहीच करु शकत न्हवतो. मी कामाला जाऊ लागल्यावर तीला घरी रहायला सांगितले. असाच एक एक दिवस पार होऊ लागला 10 वीला माझ्याबरोबर मोठे चुलत भाऊ दादा-व आतुल हे होते आमची 10 वी व्यवस्थित पार पडली. आता वाटल निवांत झालो पण खरतर आताच जास्त जबाबदारी वाढणार होती ती म्हणजे नोकरी फौज मधे भरती व्हायची पहिल्यापासुनच इच्छा होती त्यासाठी आवश्यक कागदे पत्रे पण काढली. गावातच महंत श्री. शांतिगिरी महाराज (बाबाजी) यांचा आश्रम होता तीथे आम्ही लहान होतो तेव्हापासुनच असायचो घरच काम कमी करायचो पण मठातल काम म्हटल की शाळा काॅलेज पण बुडवायचो तीथले काम करायला रहायला एक वेगळाच आनंद वाटायचा. बाबाजी पण खुप काळजी घ्यायचे.मोठ्या बहिणीचे लग्न 9 वीत असतानाच झाले त्यामुळे आमी तीघेच असायचो घरी. 10 वी झाली की काही दिवसांसाठी मुंबई ला गेलो दोन महिने काम केल तेवढाच घरच्यांना हातभार लागला कारण वडलांना वयामानाने ड्रायवींग होत न्हवते. माघारी येऊन काॅलेजला जाऊ लागलो त्यामधेच आईचे Ovary चे आॅपरेशन झाले त्यामुळे कामाचा लोड जास्तच यायचा. घरासाठी कायतरी करायचे सारख मनातली मनात वाटायच. काॅलेजला दहिवडीला गेलो तीथे नवीन मित्र नवीन ठिकाण. ....काॅलेजला NCC ला अॅडमीशन घेतले घरचे व रानातल पाहत काॅलेजला जाऊ लागलो त्याचवेळी 2004 ला भयंकर दुष्काळ पडला गुरांच्या छावण्या सुरु झाल्या. मंग तर खुपच वाईट वाटु लागले. 18 वर्षे पुर्ण झाली की भरतीला जायला सुरवात केली पहिल्या भरतीत नवीन असल्यामुळे कागदपत्रे पुर्ण नसल्याने माघारी यावे लागल नंतरच्या भरतीला मात्र पुर्ण तयारीनेच गेलो आणि भरती होऊनच आलो कारण घरातुन जाताना तीकिटसाठी जे पैसे मिळायचे ते तसेच ठेवायचो व घरच्यांना त्याची कायतरी वस्तु आणायचो. विना तिकीटच प्रवास करायचो. यावेळी पुण्याला जाताना विचारच करुन गेलेलो भरती नाही झालो तर पुण्यातच कायतरी काम पहायचे पण तशी गरज पडली नाही घरच्यांच्या पुंण्याईला बाबाजींच्या आशिर्वादाला व माझ्या प्रयत्नाला यश आले व मी भर्ती झालो. तो आनंद खरच माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी एक अप्रतिम अनुभवच होता...मी ट्रेनिंग साठी आसामला गेलो ट्रेनिंग करतानाच पायाचे ऑपरेशन झाले पण घरच्यांना खुप ऊशिरा कळवले. फौजमधे किती त्याग करावा लागतो ते तेव्हा समझले कारण ट्रेनिंग चालु असतानाच छोट्या बहिणीचे लग्न झाले पण येता नाही आले. झाल ट्रेनिंग पण पुर्ण झाले. श्रनगरला पोस्टिंग झाले आई तशी घाबरायची पण मी थापा मारुन समझ घालायचो..आता थोड घराला आधार मिळाल्यासारखे वाटु लागले. आईला ऑपरेशनमुळे काम होत न्हवते त्यामुळे घरच्यांनी लग्न करायचे ठरवले व गावातल्याच मुलीशी स्वातीशी लग्न लाऊन दिले. कालांतराने एक मुलगा झाला (शिवम) त्याने घर गजबजुन गेले.तसे आमचे पाच जणांचे कुटुंब पण फक्त नावासाठीच 5 जण कारण मी फौजमधे असल्यामुळे पाहुन्यासारखाच घरी यायचो ते पण स्वतःच्याच घरी!!! पण फौज पण एक परिवारच आहे त्याशिवाय राहुच शकत नाही तीच माझी मुख्य ओळख.गावाला कोणी फौजी किंवा मेजर म्हणुन हाक मारली की एकदम छाती फुगुन येते. चेहर्यावर एक वेगळाच भाव उमटतो.खरेच फौजमधे आल्यापासुन बरेच काही शिकायला, पहायला, अनुभवायला मिळाले.गर्व आहे मला मी फौज मधे आहे व देशाची सेवा करायचे भाग्य लाभले आहे.
आतापर
मी आभार मानतो त्या आई-वडिलांचे ज्यानी मला जन्म देऊन लहानाचे मोठे केले. वंदन करतो गरुंना (बाबाजींना) ज्यांनी योग्य मार्गदर्शन केले व नमन करतो त्या शिक्षकांना ज्यांनी मला घडवले, धन्यवाद त्या सर्व नातेवाईकांचे ज्यांनी कायम साथ दिली.बाकी दोस्तलोग भाईलोग तुम नाराज नय होनेका तुमलोग तो हमेशा अपुनके साथ हो.....
॥भारतमाता की जय॥ ॥जय श्रीराम॥ ॥जयहिंद॥