Monday, 16 May 2016

माझे आयुष्य

मी राहुल हरिभाऊ जगदाळे(राव्हल्या) मलवडी गावात एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेलो एक साधा मुलगा. वडील हरिभाऊ(बुवा) आई रुक्मिणी. मोठी बहीण कल्पना आमचे घरगुती जिवन तसे खुपच साधे व हालाकीचे होते. वडील मुंबईला ट्रक ड्रायव्हर अअसल्यामुळे केव्हातरीच गावी यायचे त्यामुळे घरच व रानातल सर्वकाही आई व मोठी बहीण पहायची जस-जसा मी मोठा होऊ लागलो तसा शाळा पाहत आईला कामात मदत करु लागलो. वडील (आण्णा) कधीतरी गावी ट्रक घेऊन यायचे तेव्हा खुप मस्त वाटायचे. लहानपणीचे आयुष्यच वेगळे, आमच्या रानात मोठी आंब्याची झाडे होती शेंदर्‍या, रोपड्या, नारळी(आता नाहीत) त्याच्यावर सुर पारंब्या खेळायचा वेगळाच आनंद असायचा.दाद्या, बंड्या, आतल्या, आमल्या, मह्या, आब्या, सच्या, सुन्या, ईन्या, पिन्या ही आमची भाव भावांची गॅन्ग आसायची. आमच्यात भांडण पण लय हुयाची त्यात मार खायला मीच असायचु. मंग ईटी-दांडु, गोट्या, सुरफाट्या असले खेळ खेळायचो करड दर्‍यात शर्ड घिऊन चारायला जायाचु. शाळेत जाताना एकत्र खुप मज्जा यायची हळुहळु आम्ही मोठे होऊ लागलो घरच्या परिस्थिती बद्धल जाणीव होऊ लागली आम्हा सर्वांच्याच घरची परिस्थिती नाजुक होती शेती होती पण पाणी म्हणावे आस नसायचं त्यामुळे शितीत काय जास्त पिकायच नाय.आम्हाला नव ड्रेस यायच म्हणल्यावर कांद वावरातन निगुन लोणंद नायतर कोल्हापुरला जाऊन ईकेपर्यंत वाट बगावी लागायची कदी कदी जुन्यावरच दिवाळी-यात्रा हुयाची. 10 वीत गेल्यावर बिल्डींग तालींच्या कामावर आई बरोबर जाऊ लागलो. आईला काम करताना पाहुन खुप वाईट वाटायचे पण तेव्हा काहीच करु शकत न्हवतो. मी कामाला जाऊ लागल्यावर तीला घरी रहायला सांगितले. असाच एक एक दिवस पार होऊ लागला 10 वीला माझ्याबरोबर मोठे चुलत भाऊ दादा-व आतुल हे होते आमची 10 वी व्यवस्थित पार पडली. आता वाटल निवांत झालो पण खरतर आताच जास्त जबाबदारी वाढणार होती ती म्हणजे नोकरी फौज मधे भरती व्हायची पहिल्यापासुनच इच्छा होती त्यासाठी आवश्यक कागदे पत्रे पण काढली. गावातच महंत श्री. शांतिगिरी महाराज (बाबाजी) यांचा आश्रम होता तीथे आम्ही लहान होतो तेव्हापासुनच असायचो घरच काम कमी करायचो पण मठातल काम म्हटल की शाळा काॅलेज पण बुडवायचो तीथले काम करायला रहायला एक वेगळाच आनंद वाटायचा. बाबाजी पण खुप काळजी घ्यायचे.मोठ्या बहिणीचे लग्न 9 वीत असतानाच झाले त्यामुळे आमी तीघेच असायचो घरी. 10 वी झाली की काही दिवसांसाठी मुंबई ला गेलो दोन महिने काम केल तेवढाच घरच्यांना हातभार लागला कारण वडलांना वयामानाने ड्रायवींग होत न्हवते. माघारी येऊन काॅलेजला जाऊ लागलो त्यामधेच आईचे Ovary चे आॅपरेशन झाले त्यामुळे कामाचा लोड जास्तच यायचा. घरासाठी कायतरी करायचे सारख मनातली मनात वाटायच. काॅलेजला दहिवडीला गेलो तीथे नवीन मित्र नवीन ठिकाण. ....काॅलेजला NCC ला अॅडमीशन घेतले घरचे व रानातल पाहत काॅलेजला जाऊ लागलो त्याचवेळी 2004 ला भयंकर दुष्काळ पडला गुरांच्या छावण्या सुरु झाल्या. मंग तर खुपच वाईट वाटु लागले. 18 वर्षे पुर्ण झाली की भरतीला जायला सुरवात केली पहिल्या भरतीत नवीन असल्यामुळे कागदपत्रे पुर्ण नसल्याने माघारी यावे लागल नंतरच्या भरतीला मात्र पुर्ण तयारीनेच गेलो आणि भरती होऊनच आलो कारण घरातुन जाताना तीकिटसाठी जे पैसे मिळायचे ते तसेच ठेवायचो व घरच्यांना त्याची कायतरी वस्तु आणायचो. विना तिकीटच प्रवास करायचो. यावेळी पुण्याला जाताना विचारच करुन गेलेलो भरती नाही झालो तर पुण्यातच कायतरी काम पहायचे पण तशी गरज पडली नाही घरच्यांच्या पुंण्याईला बाबाजींच्या आशिर्वादाला व माझ्या प्रयत्नाला यश आले व मी भर्ती झालो. तो आनंद खरच माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी एक अप्रतिम अनुभवच होता...मी ट्रेनिंग साठी आसामला गेलो ट्रेनिंग करतानाच पायाचे ऑपरेशन झाले पण घरच्यांना खुप ऊशिरा कळवले. फौजमधे किती त्याग करावा लागतो ते तेव्हा समझले कारण ट्रेनिंग चालु असतानाच छोट्या बहिणीचे लग्न झाले पण येता नाही आले. झाल ट्रेनिंग पण पुर्ण झाले. श्रनगरला पोस्टिंग झाले आई तशी घाबरायची पण मी थापा मारुन समझ घालायचो..आता थोड घराला आधार मिळाल्यासारखे वाटु लागले. आईला ऑपरेशनमुळे काम होत न्हवते त्यामुळे  घरच्यांनी लग्न करायचे ठरवले व गावातल्याच  मुलीशी स्वातीशी लग्न लाऊन दिले. कालांतराने एक मुलगा झाला (शिवम) त्याने घर गजबजुन गेले.तसे आमचे पाच जणांचे कुटुंब पण फक्त नावासाठीच 5 जण कारण मी फौजमधे असल्यामुळे पाहुन्यासारखाच घरी यायचो ते पण स्वतःच्याच घरी!!! पण फौज पण एक परिवारच आहे त्याशिवाय राहुच शकत नाही तीच माझी मुख्य ओळख.गावाला कोणी फौजी किंवा मेजर म्हणुन हाक मारली की एकदम छाती फुगुन येते. चेहर्‍यावर एक वेगळाच भाव उमटतो.खरेच फौजमधे आल्यापासुन बरेच काही शिकायला, पहायला, अनुभवायला मिळाले.गर्व आहे मला मी फौज मधे आहे व देशाची सेवा करायचे भाग्य लाभले आहे.

आतापर

मी आभार मानतो त्या आई-वडिलांचे ज्यानी मला जन्म देऊन लहानाचे मोठे केले. वंदन करतो गरुंना (बाबाजींना) ज्यांनी योग्य मार्गदर्शन केले व नमन करतो त्या शिक्षकांना ज्यांनी मला घडवले, धन्यवाद त्या सर्व नातेवाईकांचे ज्यांनी कायम साथ दिली.बाकी दोस्तलोग भाईलोग तुम नाराज नय होनेका तुमलोग तो हमेशा अपुनके साथ हो.....



॥भारतमाता की जय॥             ॥जय श्रीराम॥                              ॥जयहिंद॥  

Saturday, 2 April 2016

एका आईचे मनोगत

मलाही वाटतं ..... 
       कधीतरी स्वतःच्याच तालात जगावंघड्याळाचा लगाम तोडून         कसं मोकळं मोकळं व्हावं  ! गरम चहाचा आयता कप    आरामखुर्चीत बसून ऐटित संपवावामलाही वाटतं    "आज नाश्त्याला काय आहे हो ?"हा प्रश्न एकदातरी मी विचारावा ...! मलाही वाटतं     स्वयंपाकाची धावपळ , जेवणाची तयारीकशाकशाचा विचार न करता      मस्तीत पेपर वाचावाजेवणाच्या क्रमवारीत      माझा पहिला नंबर लागावा .....! मलाही वाटतं ...       तडक वामकुक्शीला वळावं ,  उरलं-सुरलं, रात्री काय ?        चक्रात त्या न पडता   आवडीच्या पुस्तकात        तासंनतास रमावं ...! मला नसतो वीकएंड      ना मिळतो हॉलिडेसुट्टी असेल तेंव्हा तरकामे वाढतात दुप्पटीने .... ! थांब थोडी जरा आता     नुसतं वाटून काय होणार ?नेहमीच्याच रहाटगाड्ग्यात      उसंत तरी कधी मिळणार ? माझी ना युनियन     ना सरकारचा ठावकुणापुढे मांडणार      मागण्यांचा प्रस्ताव ? बाहेरचं जग मोठं      मोठया जगाच्या मागण्या हजारमाझ्या  साध्याशा या मागण्यांना     इथे भीक तरी कोण घालणार ..?

नक्की जगायचे तरी कसे?

"जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय .मला सर्वांचंच म्हणणं पटतं. त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय.तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत. जगाचं असंच असतं.मनुष्य गरीब असला की लोकम्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही. श्रीमंत असला की म्हणतात ,दोन नंबर करत असणार !  त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं?प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब राबराबतोय .झालो का श्रीमंत ? तो श्रीमंत झाला. निश्चीत बेईमानी केली असणार त्याने ! त्याशिवाय तो श्रीमंत होऊच शकणार नाही .पैशाच्या मागे दिवसरात्र धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे.पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात ,  त्याच्या जीवनात महत्वाकांक्षा नाही.नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात.जीवनात चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या म्हणतात.समजा वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही.लगेच त्याला म्हणणार ,बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा !स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात ? आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत.म्हणतात काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा ? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही.असं आयुष्य काय कामाचं? जास्त भाविक असला तर म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव.मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात ,  अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक? कुठल्या चक्कीचा आटा खातोय कुणास ठाऊक ? ''मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ म्हणतात. जाड असला की हत्ती म्हणतात.  बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ जाड माणसांमुळेच पडतो.सहज कोणाला मदत केली तर म्हणतात यामागे काहीतरी हेतू असणार!नाही मदत केली तर म्हणणार साधी माणूसकी नाही.सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात अंगात थोडातरी स्वार्थ हवा होता.स्वार्थी असलाच तर म्हणतात सरळ स्वभाव हवा . स्वार्थाचा पैसा काय कामाचा ?खेळकर स्वभाव असला तर म्हणतात आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही.गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात हसण्याची अलर्जी आहे.तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.अयशस्वी झालात तर म्हणणार आमचं ऐकलं नाही . मग भोगा कर्माची फळं . लोकांचं काय घेऊन बसलात? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची लोकांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं?जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं ? मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय. फिदीफिदी हसतील ते हसू देत की !बोटं मोडीत बसतील ते बसू देत की !आपण का शरमून जायचं ?कशासाठी वरमून जायचं ?कशासाठी भयाने ग्रासून जायचं ?फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं ?आपलं जीवन आपण ठरवायचं,कसं जगायचं, कण्हत कण्हत कि गाणं म्हणत....आपणच ठरवायचं......

Saturday, 26 March 2016

" ख्वाहिश  नही  मुझे  मशहुर  होने  की।आप  मुझे  पहचानते  हो  बस  इतना  ही  काफी  है।अच्छे  ने  अच्छा  और  बुरे  ने  बुरा  जाना  मुझे।क्यों  की  जिसकी जितनी जरुरत  थी  उसने  उतना  ही  पहचाना  मुझे। ज़िन्दगी  का  फ़लसफ़ा  भी   कितना  अजीब  है,शामें  कटती  नहीं,  और  साल  गुज़रते  चले  जा  रहे  हैं....!!एक  अजीब  सी  दौड़  है  ये  ज़िन्दगी,जीत  जाओ  तो  कई  अपने  पीछे  छूट  जाते  हैं, और  हार  जाओ  तो  अपने  ही  पीछे  छोड़  जाते  हैं।बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर...क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है..मैंने समंदर से सीखा है जीने का सलीक़ा,चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना ।।ऐसा नहीं है कि मुझमें कोई ऐब नहीं है पर सच कहता हूँ मुझमे कोई फरेब नहीं हैजल जाते हैं मेरे अंदाज़ से मेरे दुश्मन क्यूंकि एक मुद्दत से मैंनेन मोहब्बत बदली और न दोस्त बदले .!!.एक घड़ी ख़रीदकर हाथ मे क्या बाँध ली..वक़्त पीछे ही पड़ गया मेरे..!!सोचा था घर बना कर बैठुंगा सुकून से..पर घर की ज़रूरतों ने मुसाफ़िर बना डाला !!!सुकून की बात मत कर ऐ ग़ालिब....बचपन वाला 'इतवार' अब नहीं आता |जीवन की भाग-दौड़ में -क्यूँ वक़्त के साथ रंगत खो जाती है ?हँसती-खेलती ज़िन्दगी भी आम हो जाती है..एक सवेरा था जब हँस कर उठते थे हमऔरआज कई बारबिना मुस्कुराये ही शाम हो जाती है..कितने दूर निकल गए,रिश्तो को निभाते निभाते..खुद को खो दिया हमने,अपनों को पाते पाते..लोग कहते है हम मुस्कुराते बहोत है,और हम थक गए दर्द छुपाते छुपाते.."खुश हूँ और सबको खुश रखता हूँ,लापरवाह हूँ फिर भी सबकी परवाहकरता हूँ..मालूम है कोई मोल नहीं मेरा,फिर भी,कुछ अनमोल लोगों सेरिश्ता रखता हूँ...!