बोलके शब्द
Monday, 16 May 2016
माझे आयुष्य
मी आभार मानतो त्या आई-वडिलांचे ज्यानी मला जन्म देऊन लहानाचे मोठे केले. वंदन करतो गरुंना (बाबाजींना) ज्यांनी योग्य मार्गदर्शन केले व नमन करतो त्या शिक्षकांना ज्यांनी मला घडवले, धन्यवाद त्या सर्व नातेवाईकांचे ज्यांनी कायम साथ दिली.बाकी दोस्तलोग भाईलोग तुम नाराज नय होनेका तुमलोग तो हमेशा अपुनके साथ हो.....
Saturday, 2 April 2016
एका आईचे मनोगत
मलाही वाटतं .....कधीतरी स्वतःच्याच तालात जगावंघड्याळाचा लगाम तोडून कसं मोकळं मोकळं व्हावं ! गरम चहाचा आयता कप आरामखुर्चीत बसून ऐटित संपवावामलाही वाटतं "आज नाश्त्याला काय आहे हो ?"हा प्रश्न एकदातरी मी विचारावा ...! मलाही वाटतं स्वयंपाकाची धावपळ , जेवणाची तयारीकशाकशाचा विचार न करता मस्तीत पेपर वाचावाजेवणाच्या क्रमवारीत माझा पहिला नंबर लागावा .....! मलाही वाटतं ... तडक वामकुक्शीला वळावं , उरलं-सुरलं, रात्री काय ? चक्रात त्या न पडता आवडीच्या पुस्तकात तासंनतास रमावं ...! मला नसतो वीकएंड ना मिळतो हॉलिडेसुट्टी असेल तेंव्हा तरकामे वाढतात दुप्पटीने .... ! थांब थोडी जरा आता नुसतं वाटून काय होणार ?नेहमीच्याच रहाटगाड्ग्यात उसंत तरी कधी मिळणार ? माझी ना युनियन ना सरकारचा ठावकुणापुढे मांडणार मागण्यांचा प्रस्ताव ? बाहेरचं जग मोठं मोठया जगाच्या मागण्या हजारमाझ्या साध्याशा या मागण्यांना इथे भीक तरी कोण घालणार ..?
नक्की जगायचे तरी कसे?
"जगात वागावं कसं याची
सध्या मला चिंता सतावतेय .मला सर्वांचंच म्हणणं
पटतं. त्यामुळेच मी अडचणीत
सापडलोय.तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत. जगाचं असंच असतं.मनुष्य गरीब असला की
लोकम्हणतात पैसे कमवायची
अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही. श्रीमंत असला की म्हणतात
,दोन नंबर करत असणार ! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत
होतं?प्रामाणिकपणे वागून
पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब राबराबतोय .झालो का श्रीमंत
? तो श्रीमंत झाला. निश्चीत बेईमानी केली असणार त्याने ! त्याशिवाय तो श्रीमंत होऊच
शकणार नाही .पैशाच्या मागे दिवसरात्र
धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे.पैशाला जीवनात महत्व
दिलं नाही तर म्हणतात , त्याच्या जीवनात महत्वाकांक्षा
नाही.नुसतेच पैसे कमावले
आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात.जीवनात चैन केली आणि
जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या म्हणतात.समजा वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही
सुख लोकांना पाहवत नाही.लगेच त्याला म्हणणार ,बघा कसा बसलाय आयत्या
बिळावर नागोबा !स्वत:चं काही
कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात ? आयुष्यात कष्ट करून
पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत.म्हणतात काय उपयोग
आहे त्याच्या आयुष्याचा
? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही.असं आयुष्य काय कामाचं? जास्त भाविक असला तर म्हणतात मनी नाही भाव
म्हणे देवा मला पाव.मंदीरात नाही गेला
तर नास्तिक म्हणतात.तारुण्यात अकाली मृत्यू
आला तर हळहळतात , अरेरे फार लवकर गेला. त्याचा
भविष्यकाल उज्ज्वल होता. दीर्घायुषी झालात तर
तेच लोक म्हणतील अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार
कुणास ठाऊक? कुठल्या चक्कीचा आटा खातोय कुणास ठाऊक ? ''मनुष्य तब्येतीने
बारीक असला तर झुरळ म्हणतात. जाड असला की हत्ती म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात
तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.जाड मनुष्य बघितल्यावर
म्हणतात हा दुष्काळ जाड माणसांमुळेच पडतो.सहज कोणाला मदत केली
तर म्हणतात यामागे काहीतरी हेतू असणार!नाही मदत केली तर म्हणणार
साधी माणूसकी नाही.सरळ स्वभावाचा असेल
तर म्हणतात अंगात थोडातरी स्वार्थ हवा होता.स्वार्थी असलाच तर
म्हणतात सरळ स्वभाव हवा . स्वार्थाचा पैसा काय कामाचा ?खेळकर स्वभाव असला
तर म्हणतात आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही.गंभीर असणंही त्यांना
रुचत नाही. म्हणतात हसण्याची अलर्जी
आहे.तुम्ही यशस्वी झालात
तरी यांना अडचण होते. म्हणतात
आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.अयशस्वी झालात तर म्हणणार
आमचं ऐकलं नाही . मग भोगा कर्माची फळं . लोकांचं काय घेऊन बसलात? काहीही केलंत तरी त्याला
नावं ठेवण्याची लोकांना
सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं?जग काय म्हणेल याची
पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं ? मंगेश पाडगावकरांनी
फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय. फिदीफिदी हसतील ते
हसू देत की !बोटं मोडीत बसतील ते
बसू देत की !आपण का शरमून जायचं
?कशासाठी वरमून जायचं
?कशासाठी भयाने ग्रासून
जायचं ?फुलायच्या प्रत्येक
क्षणी नासून जायचं ?आपलं जीवन आपण ठरवायचं,कसं जगायचं, कण्हत
कण्हत कि गाणं म्हणत....आपणच ठरवायचं......
Saturday, 26 March 2016
" ख्वाहिश नही मुझे मशहुर होने की।आप मुझे पहचानते हो बस इतना ही काफी है।अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे।क्यों की जिसकी जितनी जरुरत थी उसने उतना ही पहचाना मुझे। ज़िन्दगी का फ़लसफ़ा भी कितना अजीब है,शामें कटती नहीं, और साल गुज़रते चले जा रहे हैं....!!एक अजीब सी दौड़ है ये ज़िन्दगी,जीत जाओ तो कई अपने पीछे छूट जाते हैं, और हार जाओ तो अपने ही पीछे छोड़ जाते हैं।बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर...क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है..मैंने समंदर से सीखा है जीने का सलीक़ा,चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना ।।ऐसा नहीं है कि मुझमें कोई ऐब नहीं है पर सच कहता हूँ मुझमे कोई फरेब नहीं हैजल जाते हैं मेरे अंदाज़ से मेरे दुश्मन क्यूंकि एक मुद्दत से मैंनेन मोहब्बत बदली और न दोस्त बदले .!!.एक घड़ी ख़रीदकर हाथ मे क्या बाँध ली..वक़्त पीछे ही पड़ गया मेरे..!!सोचा था घर बना कर बैठुंगा सुकून से..पर घर की ज़रूरतों ने मुसाफ़िर बना डाला !!!सुकून की बात मत कर ऐ ग़ालिब....बचपन वाला 'इतवार' अब नहीं आता |जीवन की भाग-दौड़ में -क्यूँ वक़्त के साथ रंगत खो जाती है ?हँसती-खेलती ज़िन्दगी भी आम हो जाती है..एक सवेरा था जब हँस कर उठते थे हमऔरआज कई बारबिना मुस्कुराये ही शाम हो जाती है..कितने दूर निकल गए,रिश्तो को निभाते निभाते..खुद को खो दिया हमने,अपनों को पाते पाते..लोग कहते है हम मुस्कुराते बहोत है,और हम थक गए दर्द छुपाते छुपाते.."खुश हूँ और सबको खुश रखता हूँ,लापरवाह हूँ फिर भी सबकी परवाहकरता हूँ..मालूम है कोई मोल नहीं मेरा,फिर भी,कुछ अनमोल लोगों सेरिश्ता रखता हूँ...!
Subscribe to:
Posts (Atom)